डी. हर्षदा - लेख सूची

कुपोषणाची तपासणी

पोषणाच्या बाबतीत गरोदर व अंगावर दूध पाजणाऱ्या स्त्रिया आणि शाळेत जाण्याच्या वयाच्या आतील मुले हे समाजातील सर्वांत हळवे गट आहेत. आदिवासी भागात या गटांच्या पोषण-पातळीची आणि अन्न-सुरक्षेची एक पाहणी केली गेली. गडचिरोली जिल्ह्यातील वनाच्छादित गावे (‘वन-गट’) आणि जंगल तोडून शेतीकडे वळलेली गावे (‘शेती गट’) यांचा हा तौलनिक अभ्यास होता. पाहणीसाठीचे नमुने आकाराने लहान होते, कारण …